बेळगाव : बेळगाव शहरात विविध ठिकाणी भरणारा फुलबाजार, फळबाजार, चिंच, केळी यासह खाजगी एपीएमसीचे सरकारी एपीएमसीत स्थलांतर करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
कन्नड साहित्य भवन पासून सुरु झालेल्या निषेध मोर्चातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सरकार विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरातील खासगी एपीएमसीमध्ये फुले, फळे, चिंच, केळी यांची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी केला. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून तातडीने खाजगी एपीएमसीसह इतर सर्व घाऊक बाजारपेठा सरकारी एपीएमसीमध्ये स्थलांतरित करण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली.