बेळगाव : रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बालिका आदर्श शाळेमध्ये घेण्यात आलेल्या पाढे पाठांतर स्पर्धेत मराठी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
प्रथम क्रमांक अन्विता महेश चतुर, द्वितीय क्रमांक पूर्वी रमेश घाडी, तृतीय क्रमांक जयेश रवींद्र गुरव त्याचबरोबर देसुर येथे झालेल्या येळ्ळूर झोनल लेवल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये शाळेचे विद्यार्थी निधी देसाई धार्मीक पठन द्वितीय, अश्वर्या पाटील कंठ पाठ द्वतीय, जीगनेश गुरव आशु भाषण प्रथम, जयेश गुरव मातकाम प्रथम, श्रुष्ठी पत्तार कथा कथन द्वितीय, लखन कुगजी चित्रकला द्वतीय, श्रेयस चत्तुर मेमिक्री तृतीय या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयी स्पर्धकांना शाळेचे एस. डी. एम. सी. सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर यांनी आपल्या आजी कै. गंगुबाई लुमाण्णा यळगुकर यांच्या स्मरणार्थ प्रतिभा कारंजी आणि पाढे पाठांतर स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून पुढील यशासाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी एस.डी एम.सी. मुर्तीकुमार माने, जोतीबा शां.पाटील उपस्थित होते. यांना मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी व शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि एसडीएमसीचे प्रोत्साहन लाभले.