Saturday , October 19 2024
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र – दसरा उत्सव महामंडळाची स्थापना; अध्यक्षपदी प्रा. आनंद आपटेकर

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षी शहर आणि उपनगरात नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडवून घेण्यासाठी तसेच, उत्सव अतिशय चांगल्याप्रकारे पार पडावा, यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र – दसरा उत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. आनंद आपटेकर यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन मंडळाबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (ता. २८) जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोंडुसकर होते. यावेळी कोंडुसकर म्हणाले की, दसरा काळात येणाऱ्या विविध समस्या सोडविण्याची जबाबदारी घेतली जाईल. विद्यार्थी, युवक युवतींनी सण-उत्सवात सहभागी होताना अभ्यासाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच वेळेचे बंधन पाळावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणाले की, शिवजयंती व गणेशोत्सव मिरवणुकीवेळी पोलिस प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची बंधने लादली जातात. त्यावेळी महामंडळ सातत्याने पाठपुरावा करून समस्या दूर करून घेत असते. त्याचप्रमाणे नवरात्री उत्सव काळातही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी नवीन महामंडळाने प्रयत्न करावेत. महामंडळाने केलेल्या सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करावे. यामध्ये शहराच्या विविध भागातील कार्यकर्त्यांना सामावून घेऊन पुढील वाटचाल करावी, अशी सूचना केली.

बेळगाव शहरातील शिव जयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असून, मध्यवर्ती महामंडळ सातत्याने मंडळांना सहकार्य करत असते. त्याचबरोबर दसरा काळातही विविध उपक्रम राबवावेत आणि समाज प्रबोधनाचे काम हाती घ्यावे, असे मत अंकुश केसरकर यांनी व्यक्त केले.

आनंद आपटेकर यांनी प्रास्ताविक केले. शिवराज पाटील, दत्ता जाधव, माजी नगरसेवक अनिल पाटील, युवा कार्यकर्ते प्रशांत भातकांडे, बाळू किल्लेकर, सुनिल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक शिवाजी मंडोळकर, चंद्रकांत कोंडुस्कर, उमेश कुऱ्याळकर, विजय तमुचे, बळवंत शिंदोळकर, सुरज मुतगेकर, नरू निलजकर, लक्ष्मण किल्लेकर, बाळू जोशी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *