बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व महामंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांची आज कपिलेश्वर तलावाची पाहणी केली. बेळगावातील काही विविध भागातील गणेश भक्तांनी महामंडळाचे अध्यक्ष कोंडुस्कर यांना फोन करून विसर्जन तलाव स्वच्छतेसंदर्भात काही अडचणी सांगितल्या. त्याचे दखल घेऊन तातडीने विसर्जन तलावाला आज 29 सप्टेंबर 2024 रोजी भेट दिली व तेथील समस्यांवर चर्चा केली.
विसर्जनाच्या काही दिवसातच परिसरात दुर्गंधी येत होता. त्यामळे महापालिकेने दखल घेऊन लवकरच तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले व जुना तलाव पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेले आहे. नवीन तलाव येत्या दोन-तीन दिवसात ते काम पूर्ण होईल अशी माहिती मिळाली. परंतु काही नागरिकांनी ओव्हरब्रीजवरून जाताना छायाचित्र, व्हिडिओ चित्रीकरण करून ते विविध प्रसार माध्यमातून पाठवल्या त्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला होता.
महामंडळाच्या अध्यक्षांनी विनंती केली आहे की, असे कोणी छायाचित्र व व्हिडिओ करून ते प्रसार माध्यमांना घालू नये. एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे घेऊन महामंडळाशी चर्चा करावी किंवा अधिकाऱ्यांच्या चर्चा कराव्यात जेणेकरून त्यातून मार्ग निघेल. आपण त्याची चित्रीकरण करून व्हिडिओ करून प्रसार माध्यमातून पसरून आपणच आपल्या देव देवतांचे विटंबना करत आहोत ती थांबवावी असे अध्यक्षांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta