बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतनमध्ये दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा.सौ. मानसी दिवेकर कोल्हापूर यांचे साहित्य लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रेमानंद गुरव, उद्घाटक प्रताप सुतार, म.गांधी फोटो पूजन विजया नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
स्वागताध्यक्ष शंकर चौगले, तसेच सहभाग प्रमाणपत्र वितरण धनाजी मोरे, के.आर. भाष्कळ यांच्या हस्ते.
तरी या साहित्य लेखन कार्यशाळेसाठी साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साहित्यविषयक अभिरुची जोपासावी असे आवाहन वाय पी नाईक, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, कोमल गावडे यांनी केले आहे. नाव नोंदणी करण्यासाठी वाय पी नाईक (९४२०२०४१०५) संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta