बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, वार्ता विभाग तसेच बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सौध येथे आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात संगीत शिक्षक विनायक मोरे, अक्षता मोरे आणि सहकारी यांच्या स्वरांजली भजन संगीताने कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांनी वैष्णव जन तो तेणे कहिए, रघुपती राघव राजाराम, हे राम, इतनी शक्ती हमे देना दाता, पायोजी मैने रामरतन धन पायो, दे दी हमे आजादी ही गीते समरसून प्रस्तुत केली. त्यांना गजानन कुलकर्णी यांनी उत्कृष्ट तबला साथ दिली.
यावेळी आमदार असिफ सेठ, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेग्गानायक, वार्ता विभागाचे गुरुनाथ कुडबूर, साहित्यिक शिरीष जोशी, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी आदींसह सरकारी अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta