बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेत मोठ्या प्रमाणात घडलेल्या घडामोडीमुळे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
काल बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा सादर केला. अध्यक्ष रमेश कत्ती यांच्याविरोधात १४ संचालकांनी बंड पुकारून अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावाची संवेदनशीलता ओळखून रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा दिला.
Belgaum Varta Belgaum Varta