Friday , October 18 2024
Breaking News

ग्रामीण भागात जादा बस सेवा उपलब्ध करा : तालुका म. ए. समितीचे निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यात वेळेत तसेच नियमित बस चालू करण्याबाबत तालुका समितीतर्फे परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.
बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अपुऱ्या बस असून त्या नियमित वेळेत धावत नाहीत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे परिवहन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जास्तीच्या बस सोडाव्यात जेणेकरून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोयीचे होईल आपुऱ्या बस सेवेमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना बसमध्ये लोंबकळत प्रवास करावा लागतो त्यामुळे उचगाव, बेकिंनकेरे, बेळगाव ते हंदिगनूर, काकती, बस्तवाड, आंबेवाडी, कंग्राळी केएच ते कडोली तसेच कलखाम्ब या मार्गांवर वेळेत आणि जास्तीच्या बस गाड्या सोडण्याबाबतची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच येत्या 15 दिवसात सदर निवेदनाचा विचार न केल्यास तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे परिवहन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

बेळगाव तालुक्यातील बसेसची समस्या ग्रामीण भागात सकाळी 9 ते 11 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत कमी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची अडचण होत असून, जीव मुठीत धरून प्रावास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अपघात घडले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसेसची संख्या वाढवावी. शक्ती योजनेतून महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्याने सरकारची स्तुती होत असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील, आर. के. पाटील, मनोहर संताजी, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील, मल्लाप्पा गुरव सुधीर चव्हाण, आनंद पाटील, संतोष मंडलिक, अनिल पाटील, बाबाजी देसुरकर, मारुती पाटील, यल्लाप्पा घंटांनी, बाळासाहेब भगरे, नारायण दळवी, मनोहर हुंदरे, पियुष हावळ, डी. बी. पाटील, राजू किणयेकर, अरुण जाधव, विनायक पाटील, दीपक पाटील, आदी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

म्हादई योजना १५ दिवसांत लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Spread the love  बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    प्रवासी बस सुध्दा कारण विध्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल चालेत.
    भी नको तर कुत्र आवरा आस झालय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *