Friday , March 6 2026
Breaking News

दसरा महामंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य आनंद आपटेकर यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात दसरा महोत्सव साठी मध्यवर्ती महामंडळ स्थापन करण्यात आले. मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ बेळगावचे खजिनदार व बेळगावचा राजा गणेश मंडळ चव्हाट गल्लीचे सचिव प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांचे निवड झाल्याबद्दल गल्लीतील पंचमंडळ गणेश मंडळ, शिवजयंती मंडळ व सर्व मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 जालगार मारुती मंदिर चव्हाट गल्ली येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार निमित्त बेळगावचा राजा मंडळाच्या वतीने श्री मारुती मंदिर येथे पानाची पूजा बांधून महारती करण्यात आली. दसरा उत्सव निमित्त बेळगावच्या राजा गणेश मंडळाच्या वतीने श्री मारुती देवाला चांदीचा हार अर्पण करण्यात आला.

प्राचार्य आनंद आपटेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्रात असो देवस्थान असो वैद्यकीय सेवा असो अशा विविध क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद कार्य चालू आहे. त्याचीच एक पोचपावती म्हणून त्यांना हे अध्यक्षपदी निवड करण्यात आला आहे. त्याबद्दल समस्त चवाट गल्ली नागरिकांनी अशा व्यक्तीला अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महामंडळाचे कौतुक केले

याप्रसंगी उत्तम नाकाडे, विकास कलघटगी, नागेंदर नाईक, जोतिबा धामणेकर, श्रीनाथ पवार, निशांत खुडे, संदीप कामुले, रोहन जाधव, अनंत बामणे, विशाल कुठरे, अनिल गुंडकल, वृषभ मोहीते, निखिल पाटील, सत्यम नाईक, प्रसाद पवार, समर्थ नाकाडी, साहील टक्केकर, आकाश धुराजी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *