Sunday , September 20 2026
Breaking News

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Spread the love

 

मुंबई : दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक संस्कृतीच्या अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा दिल्लीत पार पडणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९८ वे संमेलन असणार आहे. तारा भवाळकर या लोक संस्कृतीच्या अभ्यासक आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी तारा भवाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. त्या ९८ वर्षातल्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. गेल्या वर्षी लेखिका अरुणा ढेरे या पाचव्या अध्यक्ष होत्या. संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *