Sunday , July 26 2026
Breaking News

सूरज चव्हाण ठरला “बिग बॉस” पाचव्या सीझनचा महाविजेता!

Spread the love

 

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवर सूरजने आपले नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरले आहे.

सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालं. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय.

टॉप ६ मधून सूरजने मारली बाजी
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप ३ मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप २ मध्ये स्थान मिळवले. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.

सूरज चव्हाण कोण आहे?
मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *