Thursday , March 5 2026
Breaking News

घरासमोर लावलेल्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

Spread the love

 

बेळगाव : काही दिवसांपूर्वी बेळगावच्या वडगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता ह्या घटना या आटोक्यात आल्या असतानाच बदमाशानी घरासमोर लावलेल्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

आदर्श नगर येथील श्रीराम कॉलनी यांची सिद्धार्थ कलघटगी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली. तसेच काल रात्री वडगाव येथील छत्रपती संभाजी नगर येथील गणेश कॉलनी फर्स्ट क्रॉस येथेही असे कृत्य करण्यात आले. सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून बदमाशानी अतिशय हुशारीने हे कृत्य केल्याचा संशय कार मालक प्रथमेश मनोज काळे यांनी व्यक्त केला असून येथील रिकाम्या जागेतून ते पळून गेले. ४-५ महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती. काल रात्रीच गाडी अंगणात उभी होती. असे प्रकार रोखण्यासाठी शहापूर पोलिसांनी दररोज पेट्रोलिंग येथे यावे, अशी मागणी कारमालक प्रथमेश मनोज काळे व शंकर गौडा यांनी केली आहे. संबंधित शहापूर पोलीस ठाण्याने गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *