Thursday , March 5 2026
Breaking News

काळ्यादिनाला परवानगी दिली जाणार नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. या दिवशी कोणत्याही कारणास्तव काळा दिवस साजरा करू दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत बोलताना दिली.

ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाणार आहे. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एक नोव्हेंबर काळ्या दिनाला कदापिही परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *