बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी संतोषची पत्नी उमा हिला अटक केले. उमा हिच्यासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची गुरुवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
संतोष पद्मन्नावर यांची पत्नी उमा हिला माळ मारुती पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले. आरोपी पत्नी उमा, फेसबुक मित्र शोबेश गौडा आणि पवन यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
9 ऑक्टोबरला संतोषचा खून केला. नंतर पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगून अंत्यसंस्कार केले. आईवर संशय आल्याने मुलगी संजना पद्मन्नावर हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. दोन दिवसांत खुनाचे गूढ उकलणाऱ्या माळमारुती पोलिसांच्या कार्याचे शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांनी कौतुक केले.