Thursday , March 5 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

Spread the love

 

बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे सोमवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ५.०० वाजता बोलावण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हौसूर आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येतो व या दिवशी बेळगावमध्ये मूक सायकल फेरी काढण्यात येते. येणारा १ नोव्हेंबर हा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी व मुक सायकल फेरी यशस्वी करण्यासाठी व कार्यकर्त्यांचे विचार ऐकण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने बोलावली आहे. तरी या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *