बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून धनादेश आणि डीडीच्या माध्यमातून खादरवाडी येथील दोघांच्या खात्यावरील 17 लाख 46 हजाराची रक्कम काढून घेतल्याचे प्रकरण उघडकीस नुकतेच आले आहे. याबाबत 18 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल परशराम धामणेकर आणि बँक मॅनेजर कणबरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण हे खादरवाडीच्या बक्कप्पाच्या वारीशी निगडित आहे. खादरवाडी येथील जमीन बेकायदेशीररित्या खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी गावचा कब्जेदार रयतेने या विक्रीला विरोध केल्यामुळे गावकऱ्यांच्या दबावाखाली येऊन जे गावातील सातबारा उताऱ्यावर पंच होते त्या पंचांच्या वारसदारांनी सदर जमीन संपूर्ण गावकऱ्यांची आहे आपली वैयक्तिक नाही त्यामुळे आपण ही रक्कम घेऊ शकत नाही असे सांगितले होते. तत्पूर्वी सदर जमीन विक्री व्यवहार करत असताना या जमिनीच्या वारसदारांनी आपले काही धनादेश आणि डीडी तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे विशाल परशराम धामणेकर यांच्या हातात दिले होते सदर कागदपत्रांचा दुरुपयोग करत विशाल धामणेकर यांनी बँक व्यवस्थापकास हाताशी धरत बँकेत अकाउंट काढून बोगस महिलेला पुढे करत गावच्या जमिनीचे पैसे बेकायदेशीररित्या बँकेतून काढून घेतले आणि मूळ जमीन मालकांसह संपूर्ण गावकऱ्यांना फसविण्यात आले आहे. विशाल धामणेकर यांच्या या कृत्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खादरवाडी ग्रामस्थांतून होत आहे
Belgaum Varta Belgaum Varta