Friday , March 6 2026
Breaking News

दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार कोसळला दरीत

Spread the love

 

बेळगाव : दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार खोल दरीत पडून अपघात झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात घडली आहे. मात्र या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे.

सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवस्थान परिसरात हा अपघात घडला. सौंदत्तीहुन यल्लम्मा देवस्थानाकडे जात असताना दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसहित दुचाकीस्वार खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाची सुटका केली. अग्निशमन दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

येडूर : श्री वीरभद्रेश्वर-भद्रकाली देवीचा कल्याण महोत्सव साजरा

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर ग्रामी श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाळी देवीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *