Thursday , March 5 2026
Breaking News

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला निवड

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी कुगजी हिने 600 मी रनिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर 3000मी रनिंग मध्ये मनश्री कुगजी प्रथम तर कनिष्का कुंडेकर 100 मी रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 4×400 मी रिलेमध्ये मनश्री कुगजी, रागिणी हट्टीकर, अक्षरा घाडी, स्वाती लोहार यांनी प्रथम आणि लक्ष्मी नायकोजी हडल्स 80 मी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजूकर, सचिव प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, शारीरिक शिक्षक एम. एम. डोंबले व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावांमध्ये कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *