Thursday , November 21 2024
Breaking News

श्री. एल. के. कालकुंद्री “आदर्श सहकार रत्न” पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) चि. बेळगाव व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगाव यांच्यातर्फे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमीत, या संस्थेचे संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री सर यांना राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दि. 27 ऑक्टोबर रोजी धर्मनाथ भवन येथे हा पुरस्कार मा. केंद्रीय मंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, मानाचा फेटा, चंदनाचा हार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. एल. के. कालकुंद्री सर यांनी गेली 45 वर्षे सहकारात कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून निस्वार्थपणे आपले अनमोल योगदान देत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून त्या काळात ग्रामीण भागात पतसंस्था नव्हत्या. त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागात पहिली पतसंस्था म्हणजे 1990 साली मार्कंडेय सहकारी संस्था मन्नूर येथे इतर सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापन केली. त्यानंतर अनेक संस्था स्थापन केल्या व मार्गदर्शन केले. या माध्यमातून त्यांनी गरजू लोकांना मदत केली, व सहकारा बरोबरच समाजकार्यात सुद्धा त्यांनी अनमोल योगदान देत आहेत, जय जनकल्याण सौहार्द या संस्थेच्या माध्यमातून सहकारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन स्थापन करून समाजातील गरीब मुलांना मदत करणे, तसेच गावातील वयोवृध्द नागरिकांचा सन्मान, माजी सैनिकांचा सन्मान, कोरोना काळात आर्सेनिक गोळ्यांचे वाटप व आशा कार्यकर्त्या यांचा सन्मान, शाळेतील मुलांसाठी बौद्धिक स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
तसेच जय जनकल्याण सौहार्द ही संस्था संस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली आज कमी कालावधीत गरुडझेप घेत आहे व अल्पकाळात सोसायटीची उन्नती होत आहे, सहकार व सामाजिक सेवा कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, मॅनेजर महेश काकतकर तसेच एन. के. कालकुंद्री, टी. के. मंडोळकर, दीपा नागोजीचे व उमेश नागोजीचे व सल्लागार मंडळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *