बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरी काढली. या फेरीत सहभागी झालेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे व्यक्तव्य सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची गरज नाही. ते फक्त नावात आहे. वर्षातून एकदा समिती नेत्यांना काळा दिवस आठवतो. समितीवर बंदी घालण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले. समितीवर बंदी घातल्यास लढा पुन्हा आक्रमक होईल. त्यामुळे त्यावर बंदी घातली जाणार नाही.