बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या दालनात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवनावर यांचा तपास अन्यत्र वळवावा व प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, या मागणीसाठी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून चन्नम्मा सर्कल येथे रास्ता रोको केला.
तहसीलदार कार्यालयातून सौंदत्ती यल्लमा मंदिर देवस्थान प्रशासन कार्यालयात बदली केल्याने तसेच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून रुद्रण्णाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मंत्री हेब्बाळकर यांचे आप्त स्वकीय सोमू, तहसीलदार नागराज आणि अशोक यांची नावे व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याचा संताप व्यक्त करीत बेळगाव भाजपकडून चन्नमा सर्कलमध्ये निदर्शने करून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्ष उपनेते अरविंद म्हणाले की, बेळगाव तहसीलदार कार्यालयातील दालनात एसडीए कर्मचारी रुरुद्रण्णा यडवनावर यांच्या आत्महत्येमागे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आप्त स्वकीयांचे नाव आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. रुद्रण्णा यडवनावर यांच्या आत्महत्येचा तपास दुसरीकडे वळवल्याचा संशय आहे. पोलिसांनी योग्य तपास करावा. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे ते म्हणाले.
रुद्रण्णाने लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आप्त स्वकीय सोमू हा आत्महत्येस कारणीभूत असल्याचा व्हॉट्सॲप मेसेज पाठवून आत्महत्या केली. नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे ते म्हणाले. रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणी आम्ही राज्यव्यापी लढा देऊ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आप्त स्वकीय सोमू याच्यावर आरोप करण्यात आला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे ते म्हणाले.
माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, रुद्रण्णाच्या आत्महत्येला तीन दिवस झाले आहेत. रुद्रण्णा हा लिंगायत समाजाचा होता, हेब्बाळकर हे पंचमसाली समाजाच्या लढ्यात आघाडीवर होते. प्रभावशाली मंत्री असूनही त्या दोन दिवस गप्प का होत्या असा सवाल त्यांनी केला.
रुद्रण्णाने दोन दिवसांनी आत्महत्या करून पुरावे नष्ट केल्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुद्रण्णाला न्याय मिळावा, असे विधान केले. हा मोठा विनोद आहे. रुद्रण्णाचा मोबाईल गायब आहे. हेब्बाळकरांना सत्तेची लालसा नव्हती तर हेब्बाळकर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाऊन दोन दिवस गप्प का राहिल्या?
रुरुद्रण्णाच्या आत्महत्येला सरकारच्या बाजूने न्याय मिळण्याची आशा नाही, असे ते म्हणाले.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर विभागाच्या अध्यक्षा गीता सुतार, डॉ. रवी पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते मुरुगेंद्र गौडा पाटील, रुद्रण्णा चंदरगी, डॉ. सोनाली सरनोबत, सविता गुड्डाकाइ, जेडीएस नेते मारुती अष्टगी आदी उपस्थित होते.