येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने येत्या 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या विशेष साहित्य पुरस्कारासाठी साहित्यिक, लेखक यांना आवाहन करण्यात येत आहे की सन 2023 पासून कै. गंगुबाई आप्पासाहेब गुरव विशेष साहित्य पुरस्कार देण्यात येत असून, या पुरस्काराचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव हे आहेत. मराठी साहित्यामधील कथा, कादंबरी, नाटक, कविता आदीमध्ये ग्रामीण भागातील स्त्रीचे चित्रण उठावदारपणे मांडण्यात आलेले आहे. अशा साहित्य कृतीला आप्पासाहेब गुरव यांच्या आजी कै. गंगुबाई आ. गुरव यांच्या नावे हा साहित्य पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये सात हजार, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. तेव्हा लेखकांनी आपली पुस्तके खालील पत्त्यावर शनिवार ता. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : परशराम मोटराचे
परमेश्वर नगर, येळ्ळूर, तालुका जिल्हा बेळगाव, कर्नाटक.
मोबाईल : 9341339940.