Thursday , November 21 2024
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून आदिती शंकर पाटील हिने 40 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले.

साईशा गोंडाळकर हिने 45 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. एकता राऊत हिने 71 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले. श्रद्धा पाटील हिने 87 अधिक वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. रघुवीर देसाई याने 67 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. श्रवण खुडे याने 49 वजनी गटात कास्यपदक पटकाविले आहे

आदिती शंकर पाटील हिची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धा मणिपूर इम्पाल येथे होणार आहेत..

त्याचबरोबर राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मिनी ऑलिंपिक स्पर्धा कंठीरावा स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी संपन्न झाल्या त्यामध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
एकता राऊत हिने 71 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. वैभवी सायनेकर हिने फुटबॉल मध्ये बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकाविला. बसवराज हळदकर यांनी 67 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. श्रवण खुडे यांनी 42 किलो वजनी गटात कास्यपदक पटकाविले. त्याचबरोबर समीक्षा हिरोजी, श्रेयस पाटील व श्रीवास मांडवकर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

वरील सर्व खेळाडूंना कोच पूजा संताजी, क्रीडाशिक्षक महेश हगिदले, दत्ता पाटील, प्रशिक्षक श्रीधर बेंनाळकर यांचे मार्गदर्शन
तर शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिम्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतीण महिलेचा मृत्यू

Spread the loveबेळगाव : बिम्स डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्हा रुग्णालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *