बेळगाव : फेस्त ऑफ किंग सणाच्या निमित्ताने शहरातील ख्रिश्चन समुदायातर्फे धार्मिक मिरवणूक रविवारी सायंकाळी पार पडली.
बेळगाव विभागाचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली. कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथून दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.
सदर मिरवणूक सेंट जोसेफ कॉन्व्हेंट रोड, ग्लोब थिएटर, खानापूर रोड, ध. संभाजी महाराज चौक, कॉलेज रोड, वनिता विद्यालय मार्गे मार्गक्रमण करत सेंट झेवियर्स हायस्कूल परिसरातील इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च आवारामध्ये समाप्त झाली.
या मिरवणुकीत ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू, नन्स आणि नागरिक अशा सुमारे 1500 लोकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मिरवणुकी दरम्यान या सर्वांकडून प्रार्थना व भक्ती गीतांच्या माध्यमातून भगवान येशू ख्रिस्ताची स्तुती केली जात होती.
Belgaum Varta Belgaum Varta