Thursday , December 11 2025
Breaking News

लोकसाहित्य – लोककला आणि संस्कृती रुजवणे व टिकवणे अत्यंत काळाची गरज

Spread the love

 

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा नाईक यांचे प्रतिपादन

बेळगाव : एंजल फाउंडेशन आणि डी मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर स्पर्धा आणि पारंपारिक वैयक्तिक फॅशन शो, आणि मंगळागौर ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन संयुक्त कार्यक्रम बनशंकरी मंदिर भडकल गल्ली बेळगाव येथील सभागृहात कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एंजल फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. मीना बेनके होत्या.

व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून खानापुर जय जवान जय किसान संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, स्केटिंग कोच (प्रशिक्षक) सूर्यकांत हिंडलगेकर, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, डी मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तसेच एंजल फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सुतार, सामाजिक सेविका आणि उद्योजिका राणी येल्लंनगोडा, समाजसेेेेवक कवी प्रा. एन. एन. शिंदे, अवधूत तुडयेकर, प्रज्ञा शिंदे, ममता सिंगबाळ, सरिता क्षीरसागर, आणि मंगळागौर स्पर्धांचे परीक्षक म्हणून जी एस एस महाविद्यालयाच्या प्राचार्य अरुणा नाईक आणि नाट्य परिषदेच्या सदस्या स्वाती कुलकर्णी, तसेच पारंपरिक सांस्कृतिक संस्कृती प्रधान नऊवारी फॅशन शोचे परीक्षक म्हणून श्रुती पवार, जया जोशी, दिव्या यांनी परीक्षक म्हणून कार्य पाहिले.

या मंगळागौर स्पर्धामध्ये विविध अशा लोककला लोकसंस्कृती लोक परंपरा आणि मराठमोळ वैशिष्ट्य असणारं मराठी माणसात रुजवणार त्याला प्रदर्शन आणि सादरीकरण यावेळी अंदाजे किती लोक असतील या महिला किती अंदाजे आठशे महिलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

विविध डान्स आणि लोकनृत्य लोककला यांचा आविष्कार केलेल्या महिला मंडळांची नावे

नक्षत्र ग्रुप महिला मंडळ, क्षेत्र नवदुर्गा महिला मंडळ, शिवकन्या तालुका महिला मंडळ,

मंगळागौर ग्रुप डान्स मध्ये आठ संघ व मंडळांनी सहभाग घेतला होता. फॅशन शो मध्ये 42 स्पर्धक आणि भाग घेतला होता यामध्ये विविध अशा 500 पेक्षा अधिक महिलांनी लोककलांचा अविष्कार केला त्यामध्ये उत्तम अशा कला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

प्रमुख वक्त्या आणि परीक्षक म्हणून जीएसएस महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य अरुणा नाईक मार्गदर्शन करताना म्हणाल्या; स्त्रीच नटन हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग असून त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मंगळागौरीचे खेळ खेळणं हे अतिशय कठीण असून ते स्त्रीच करू शकते आणि स्त्रीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोणती स्त्री मंगळागौर खेळ खेळत असताना कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची आवश्यकता नसून मंगळागौरीच्या खेळातून सर्व प्रकारचे खेळ आणि व्यायाम होतो असे महत्त्व व्यायामाचे महत्त्व सांगितले. लोकसाहित्य आणि लोक परंपरा लोक संस्कृती ही जीवनातील महत्त्वाची असून ती संस्कृती टिकवणे आज काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन केले.

परीक्षक म्हणून लाभलेल्या नाट्य परिषदेच्या सदस्या प्रा. स्वाती कुलकर्णी म्हणाल्या; कोणतेही कला सादर करत असताना त्याच्या पाठीमागे मेहनत असते सराव असतो आणि कोणतीही साधना यशस्वी व्हायचे असेल तर त्यामध्ये सातत्यपणा असणं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोच अविष्कार या मंगळागौर गीतांच्या खेळातून पाहायला मिळतो ती संस्कृती टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्याने प्रतिपादन केले.

मंगळागौर स्पर्धांचा निकाल

1. प्रथम क्रमांक- नाविन्य ग्रुप महिला मंडळ टिळकवाडी बेळगाव

2. द्वितीय क्रमांक :- नक्षत्र ग्रुप महिला मंडळ नार्वेकर गल्ली बेळगाव

3. तृतीय क्रमांक :- नवदुर्गा महिला मंडळ वडगाव बेळगाव

नऊवारी पारंपरिक सांस्कृतिक फॅशन शो चा निकाल 

1. प्रथम क्रमांक – पुष्पा जाधव बेळगाव ( जिजामाता )

2. द्वितीय क्रमांक:- रितू शिंदोळकर बेळगाव

3. तृतीय क्रमांक :- आरती शिंदे बेळगाव

उत्तेजनार्थ क्रमांक

1. गीतांजली बडवानाचे मुजावर गल्ली बेळगाव
2. वर्षा कुंटे टिळकवाडी नगर बेळगाव
3. ज्योती पारसेकर बेळगाव
4. अश्विनी लोहार बेळगाव
5. तेजस्विनी मनुरकर बेळगाव
6. अंकिता किल्लेकर बेळगाव
7. रेखा राजगोळकर बेळगाव

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *