बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी वॉर्ड समिती स्थापन करणे आवश्यक आहे. महापालिकेकडून वॉर्ड समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रत्येक कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या लाऊडस्पिकरवरून ऑडिओ संदेश द्यावा, अशी मागणी बेळगाव वॉर्ड समिती संघाच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे करण्यात आली.
वॉर्डमधील समस्या त्वरित निवारण करण्यासाठी वॉर्ड समिती महत्त्वाची ठरते. परंतु याबाबत तितकीशी जागृती झाली नसल्याने मर्यादित अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे मनपाने मोठ्या प्रमाणात जागृती करावी, त्याचबरोबर अर्ज अधिक असतील तर पाचपेक्षा अधिक सदस्यांची संख्या करावी. मंगळूर महानगरपालिकेच्या धरतीवर बेळगावमध्ये वॉर्ड समित्यांची रचना करावी, अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta