बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. त्यांचे कार्य, सामाजिक सुधारणा याची माहिती गजानन सावंत यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. संस्कृती गुरव व साईराज गुरव यांनी महात्मा फुले यांचे गौरवगीत सादर केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके सादर केली. सूत्रसंचालन दहावीचा विद्यार्थी यश गुग्गरट्टी याने केले.
यावेळी शिक्षण संयाजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.