बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड समिती सदस्य होण्यासाठी महापालिकेकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्या वॉर्डचे सदस्यत्व मिळवून बेळगावच्या विकासात सहभाग घेण्याच्या सुवर्णसंधीचा आजच लाभ घ्या.
बेळगाव शहराच्या विकास आणि विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असून वॉर्ड समिती सदस्य बनून शहराच्या समस्यांवर कार्य करण्याची आणि सेवा देण्याची संधी मिळवता येईल. अर्ज भरण्याबाबत अधिक माहिती वॉर्ड समितीचे जिल्हा संचालक प्रेम चौगला यांनी दिली असून अर्ज नमुना आणि भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज मिळविण्यासाठी आजच महानगरपालिकेच्या कार्यालयातून अर्ज घेऊन मनपा आयुक्तांकडे सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.