बेळगाव : 2017 मध्ये व्हॅक्सिन डेपो वर महामेळावा घेण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या सी्सी424/2020 दाव्यासंदर्भात जे एम एफ सी 4 कोर्ट मध्ये आज पोलिसांच्या वतीने असि स्टंट सब इन्स्पेक्टर एच. एच. पमार यांची साक्ष नोंदविण्यात आली याप्रसंगी समितीच्या वतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंद्रे, ऍड. बाळासाहेब कागणकर आणि ऍड. वैभव कुटरे यांनी काम पाहिले न्यायालयात चाललेल्या या खटल्यात श्री. दीपक दळवी, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे आणि श्री. विकास कलघटगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.