Saturday , December 14 2024
Breaking News

सुळगा (हिं.) येथे श्री जोतिबा व काळभैरव मंदिराचे भूमिपूजन

Spread the love

सुळगा (हिं.) : कुलदैवतेला जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. शुभकार्यात कुलदैवतेला पहिला मान दिला जातो. बऱ्याच जणांना स्वतःचे कुलदैवत माहीत नसते. मात्र कुटुंबावर संकटे येतात त्यावेळी कुलदैवतेची आठवण होते. तेव्हा प्रत्येकाने स्वतःचे कुलदैवत जाणून घेणे महत्त्वाचे आहे,असे मत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते श्री. आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. सुळगा (हिं.) येथे गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी श्री. जोतिबा व काळभैरव मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष श्री. भावकू भैरु पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. परशराम फकिरा पाटील (ग्राम सुधारणा कमिटी अध्यक्ष), श्री. जोतिबा रामा पाटील (किराणा स्टोअर्स), श्री महेश कुमार धाकलु कांबळे, सामाजिक कार्यकर्ता) उपस्थित होते.

यावेळी श्री. आर. एम. चौगुले पुढे म्हणाले, जेव्हा जीवनात चढ – उतार येतात तेव्हा कुलदैवताचं आपली तारणहार असते, त्यामुळे कामाचा कितीही व्याप असला तरी कुलदैवतेचे स्मरण करावे त्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, अशा मार्मिक शब्दात त्यांनी कुलदैवतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच देवावर श्रद्धा ठेवा मात्र अंधश्रद्धेला बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तेव्हा शाळा टिकवायच्या असतील तर मंदिराप्रमाणे विद्यालयांना सुद्धा प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्वांच्या प्रयत्नातून येथे साकारले जाणारे मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास येऊ दे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी प्रास्ताविकात विक्रम जोतिबा जाधव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी श्री. आर. एम. चौगुले (कार्याध्यक्ष तालुका म. ए. समिती बेळगांव) यांच्याहस्ते श्री गणेश फोटोपूजन, श्री.जोतिबा रामा पाटील (पाटील किराणा स्टोअर्स) यांच्याहस्ते श्री जोतिबा फोटोपूजन, श्री. दिपक मल्लाप्पा पाटील (गुरुप्रसाद इंजिनिअरिंग वर्कस शिनोळी) यांच्याहस्ते श्री काळभैरव फोटोपूजन, श्री. दीपक गंगाराम कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्याहस्ते सरस्वती फोटोपूजन आणि श्री. मनोज नारायण कलखांबकर (चेअरमन, बालाजी सोसायटी सुळगा (हिं.) यांच्याहस्ते छ. शिवाजी महाराज फोटोपूजन करण्यात आले. तर श्री. विनोद गोपाळ पावशे (माजी ग्रा. पं. सदस्य उचंगाव) यांनी श्रीफळ वाढविले.

यानंतर श्री.सोमनाथ सिद्राय कांबळे (गव्ह.कॉन्ट्रॅक्टर मण्णूर), श्री. नारायण लक्ष्मण कदम (ता. पं. सदस्य सुळगा (हिं.), काशीराम ओमाण्णा पाटील (संस्थापक साईराम सोसायटी सुळगा (हिं.), श्री. मारुती सोमाण्णा पाटील चेअरमन साईराम सोसायटी सुळगा (हिं.), श्री. मनोज नारायण कलखांबकर चेअरमन बालाजी सोसायटी सुळगा (हिं.), श्री. प्रकाश महादेव पाटील, चेअरमन श्री ब्रह्मलिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सुळगा (हिं.) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन तसेच श्री. महादेव पिराजी पाटील देवस्की (पंच कमिटी उपाध्यक्ष), तसेच देवस्की पंच कमिटीचे सदस्य श्री. यल्लाप्पा रवळू कदम, श्री. लक्ष्मण चुडाप्पा कोवाडकर, श्री. परशराम यल्लाप्पा पाटील, श्री. लक्ष्मण गणू चौगुले, श्री. बाळू लक्ष्मण देवगेकर, श्री. बाळू कांबळे (कोलकार) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी श्री. प्रकाश महादेव पाटील यांनीही आपले विचार मांडले. तर अध्यक्षीय भाषणात श्री. भावकू भैरू पाटील म्हणाले, गावात श्री जोतिबा व काळभैरव मंदिर व्हावे अशी ग्रामस्थांची फार वर्षांपासूनची असलेली इच्छा आता पूर्ण होणार आहे. युवावर्गाने पुढाकार घेऊन गावातील काही मंदिरांचे सुशोभीकरण केले आहे, त्याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्यातून श्री जोतिबा व काळभैरव मंदिर लवकरात लवकर उभारले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम जोतिबा जाधव व रोहन पाटील यांनी केले. तर आभार विक्रम जोतिबा जाधव यांनी मानले.

या कार्यक्रमाला गावातील सर्व युवक मंडळे, युवा वर्ग, भजनी मंडळे, माता-भगिनी, बाळ गोपाळ व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्ती रेणुका यल्लम्मा भक्तांसाठी खुशखबर; विशेष बससेवा सुरू

Spread the love  बेळगाव : वायव्य मार्ग परिवहन महामंडळाने सौंदत्ती रेणुका यल्लम्मा भक्तांसाठी विशेष बसची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *