बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कचरा टाकणारे वाहन कालव्यात पडले व चालकाचा जागीच मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराच्या हद्दीत पालिकेच्या कचरावाहू वाहनाचे नियंत्रण सुटून मलप्रभा नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या बाळेकुंदर्गी कालव्यात पडून अपघात झाला. या अपघातात कचरावाहू वाहनाचा चालक 48 वर्षीय गदिगेप्पा कामन्नवर याचा जागीच मृत्यू झाला, तर मदतनीस मंजुनाथ सिंगण्णा बचावला आहे. सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta