बेळगाव : दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी येथील अनन्या फार्म हाऊस मन्नुर येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण ७५ कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते.तर धनविता कुलाल, तेजस्विनी देसाई, सात्विक शानभाग, अमिषा होनगेकर व श्रेया चौगुले या ५ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.
हे विद्यार्थी गेल्या ८ वर्षापासून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मन्नूर व श्री सोमनाथ मंदिर तशिलदार गल्ली येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळवली आहेत.
या कठीण परिश्रम घेऊन ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगांव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष श्री. गजेन्द्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र व स्मुर्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील ५ ही ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. आर एम चौगुले (म ए समितीचे युवा नेते), श्री. संतोष केंचनवर (रॉयल फिटनेस क्लब मन्नूर), श्री. सुनील मंडोळकर, श्री. मनोहर बंडगी, (सामाजिक कार्यकर्ता), श्री. रुकमांना पाटील(स्फूर्ती हॉटेल, होनगा), सरिता नाईक (माजी ग्रामपंचायत सदस्य) ,गजेंद्र काकतीकर (कराटे मास्टर) उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, निलेश गुरखा, श्रेया यळ्ळूरकर, सिद्धार्थ तशिलदार, कृष्णा जाधव, संजू गस्ती, रतिक लाड, आणि सूत्रसंचालन जनवी मासमर्डी आणि (पिंटू) भरमा पाखरे सर यांनी केले.