बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे गुरुवारी बेळगावात आगमन झाले.
बेळगाव विमानतळावरून ते थेट टिळकवाडी येथील वीरसौध येथे जाऊन विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल हेही पोहोचले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे स्वागत केले.
यावेळी मंत्री डॉ. जी.परमेश्वर, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, के. जी. जॉर्ज, ईश्वर खांड्रे उपस्थित होते.