
बेळगाव : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगावात उद्या दि. 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम उद्या दि. 27 डिसेंबर रोजी बेळगावात होणार होता. या पार्श्वभूमीवर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी बेळगावात तळ ठोकला होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल होणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta