बेळगाव : बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांच्यावर आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसमवेत के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य डॉ. यतींद्र सिद्धरामय्या आदी उपस्थित होते.