
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मींचा जन्मोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने देवीच्या ओटी भरण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला. पहाटेपासूनच पूजेचे विधी आणि धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते. गावात वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत पूर्णकुंभ मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी सांगितले की, 1983 सालापासून दरवर्षी देवीचा जन्मोत्सव आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जात आहे. यंदाही हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने पार पडला, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य मारुती पाटील, यल्लप्पा पाटील, महादेव पाटील, यल्लप्पा हर्जी, शंकर पाटील, बाळू पाटील, राजू चव्हाण, मल्लप्पा शांताराम पाटील आणि इतर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta