बेळगाव : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पार्ट्याचे आयोजन करण्यात येते. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि शेतकरी संघटना खादरवाडी यांच्या वतीने बसवण्णा मंदिर आणि बकाप्पा मंदिर परिसरात खडा पहारा ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात कोणत्याही पार्टीचे आयोजन करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे गावकऱ्यांना करण्यात आले आहे.
बसवण्णा मंदिर आणि बाकाप्पाची वारीचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर परिसरात खडा पहारा देण्यासाठी गावातील नागरिक व युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे प्रमुख राकेश पाटील यांनी केले आहे.
हिंदूंना जागृत करण्यासाठी आणि मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी खडा पहाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी सांगितले सांगितले आहे.