Thursday , March 5 2026
Breaking News

नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची सूचना

Spread the love

 

 

बेळगाव : नाल्याच्या कामामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना संबंधित कंत्राटदाराला समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे.
नागरिकांना विश्वासात न घेता गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नाल्याच्या कामासाठी अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने सोमवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी नाल्याचे काम बंद पाडले होते. तसेच काम हाती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी या भागातील नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. अतिशय चुकीच्या पद्धतीने तसेच नागरिकांना नोटीसा न देता काम हाती घेऊन नुकसान केले जात असल्याने अनेक नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना सांगून नागरिकांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी परिसरातील नागरिकांची चर्चा करून कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी नाल्याची रुंदी कमी करून पाच फूट करावी आणि परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन नाल्याचे काम हाती घ्यावे अशी सूचना संबंधित कंत्राटदाराला केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *