बेळगाव : कंग्राळ गल्ली वेताळ देवस्थानच्या यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लहान मुले, मुली व महिला यांनी भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन गल्लीतील युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने राबविली होती.
लिंबू चमचा, बटाटा, संगीत खुर्ची, करेला अशा अनेक स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेचे प्रायोजक एस. पी. कार ॲक्सेसरीजचे संचालक शरद पाटील, सुहास पाटील व प्रतीक पाटील यांनी व सदानंद बडवानाचे यांनी पुरस्कृत केले होते. राजेश जाधव, छोट्या, यश इंगोले, विशाल बडवानाचे, मंगेश कंग्राळकर अश्या अनेक युवकांनी ही स्पर्धा यशस्वी घडविण्यासाठी परिश्रम घेतले.