मण्णूर : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कलमेश्वर हायस्कूल, मण्णूर येथे “इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूर” या नवीन इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ डीजी आरटीएन शरद पै यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अधिष्ठाता अधिकारी आरटीएन ॲड. महेश बेल्लद उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे अध्यक्षा प्रीती चौगुले यांना डीजी आरटीएन शरद पै यांच्याहस्ते सनद प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी डीजी आरटीएन शरद पै यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना अतिशय सोप्या पद्धतीने रोटरी क्लब बेळगाव दर्पणची भूमिका आणि उद्देश सांगितला. अध्यक्ष इ. कामिनी सोमनाथ कदम आणि सचिव इ. सर्वस्वी बसवंत काकतकर यांनी समाजसेवेचा भक्कम पाया रचला असून २१ सदस्यांच्या डायनॅमिक टीमसह समाजसेवेसाठी आणि तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी तत्पर आहेत. रोटरी क्लब बेळगाव दर्पणची टीम रोटेरियन्ससोबत प्रभावीपणे कसे सहकार्य करू शकते याविषयीचे त्यांची अंतर्दृष्टी खरोखरच उद्बोधक असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षा आरटीएन रुपाली जनाज यांनी स्वागत केले. यावेळी सचिव आरटीएन शीतल चिलामी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन आशा पोतदार, एजी आरटीएन पुष्पा आणि आरटीएन सुरेखा मुम्मीगट्टी, इंटरॅक्ट क्लबच्या मेंटॉर सरिता ओऊळकर, कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. के. नाईक, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.