
येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. तर दुसऱ्या सूत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे “आपली संस्कृती, आपला विकास” यावर आपले विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण. याचबरोबर “एक तास बसा… मनसोक्त हसा” हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. तर चौथ्या सत्रात सिने अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुलाखत होणार आहे. तर पाचव्या सत्रात ‘जागर लोककलेचा’ हा जुगलबंदी भारुड, विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta