महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी दिनेश कदम यांची निवड
बेळगाव : मागील आठवड्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग या सीमाभागातील युवकांच्या शिखर समितीची स्थापना हुतात्मा स्मारक परिसरात करण्यात येऊन अध्यक्षपदी शुभम शेळके, कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड करण्यात आली, आज पुन्हा युवा समिती सीमाभागची बैठक हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक परिसरात पार पडली. धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ समिती नेते शिवाजी हावळणाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनेची विस्तारित कार्यकारिणी व तालुका समितीच्या युवा आघाडीने 12 जानेवारी युवा दिनानिमित्त आयोजित केलेल्या युवा मेळाव्याला जाहीर पाठिंबा व जागृती करण्याचे ठरविण्यात आले.
विस्तारित कार्यकारिणीबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सरचिटणीसपदी मनोहर हुंदरे, खजिनदारपदी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्षपदी प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर, विजय नेताजी जाधव, दिनेश मूधाळे (बिदर), चिटणीस सचिन दळवी, अभिजित मजुकर, उपखजिनदार इंद्रजित धामणेकर,सागर कणबरकर, हिशोब तपासनीस रणजित हावळणाचे, रमेश माळवी, राजू पाटील, प्रमुख सल्लागारपदी चंद्रकांत पाटील, सुनील किराळे, अशोक घगवे, सुनील पाटील, भागोजी पाटील, जोतिबा येळ्ळूरकर, सुरज जाधव, किरण मोदगेकर, सोशल मीडिया प्रमुख, कपिल बेळवले, सुधीर शिरोळे, कायदा सल्लागार ऍड. महेश बिर्जे, वैभव कुट्रे यांची तर महाराष्ट्र मुख्य समन्वयकपदी दिनेश कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तालुका युवा आघाडीच्या युवा मेळाव्याला पाठिंबा
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीने येत्या 12 जानेवारी रोजी युवा दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे युवा मेळाव्याचे आयोजन केले आहे, म. ए. युवा समिती सीमाभागने त्याला जाहीर पाठींबा देण्याचे ठरविण्यात आले. हा युवा मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागवार व गावोगावी जागृती बैठका घेऊन जागृती करण्याचे ठरविण्यात आले. तालुका युवा आघाडी घेत असलेल्या युवा मेळाव्याची जागृती करून युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.
या बैठकीला गजानन धामणेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर, चंद्रकांत पाटील, सागर सांगावकर, यल्लाप्पा पाटील, प्रकाश हेब्बाजी, डॉ.नितिन राजगोळकर, बसवंत घाटेगस्ती, अंकुश पाटील, विनायक हुलजी, कृष्णा चौगुले, मनोहर भगत आदी उपस्थित होते.