बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांची बेंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांची बंगळुरू प्रेस क्लबच्या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या पाच हमीपैकी सर्वात मोठी गृहलक्ष्मी योजना दर महिन्याला राज्यातील १.२५ कोटी महिलांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवत आहेत. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी त्या प्रयत्नशील आहेत.
12 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.