
बेळगाव : शुक्रवार दि. 3/1/2025 रोजी दुपारी रयत गल्लीतील युवा शेतकरी महेश होसुरकरच्या दिड एकरसह इतर शेतकऱ्यांचा शनिवारपासून तोडण्यास सुरु करण्यात येणाऱ्या ऊसाला दुपारी अचानक आग लागली. परिसरातील जवळपास 8 एकरमधील ऊस जळून गेल्याने तोंडाजवळ आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने घाम गाळून पीकवलेले पीक वाया गेल्याने सर्व शेतकरी दुखःत सापडले आहेत. आता तो ऊस कारखाने तोडून घेऊन गेल्यास त्यातील कांही टक्के कमी करुन घेतात असे समजल्याने ते अत्यंत दुखी झाले आहेत. विद्यूत खात्याने सदर ऊस पीकाचा पंचनामा करुन त्या शेतकऱ्यांना भरपाई दिल्यास आर्थिक मदत होईल.

Belgaum Varta Belgaum Varta