
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भव्य सामान्यज्ञान स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक लहान गट, प्राथमिक मोठा गट, माध्यमिक आणि महाविद्यालय गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, जिजामाता बँकेच्या नवनियुक्त अध्यक्षा लीला पाटील, उपाध्यक्षा भारती किल्लेकर, शिवानी पाटील, रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे, नगरसेवक रवी साळुंखे, दिगंबर पवार, बाळासाहेब काकतकर आदींच्या हस्ते दीपप्रज्लन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समिती नेते प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडूसकर यांच्या हस्ते, हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन समिती नेते मालोजीराव अष्टेकर व आर. एम. चौगुले यांच्या हस्ते झाले तर श्री. रमेश पावले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. अमर येळूरकर यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि अशा भव्य स्पर्धेचे नियोजन केल्याबद्दल युवा समितीचे अभिनंदन केले. रमेश पावले म्हणाले की, सीमाभागातील इतक्या बहुसंख्येने मराठी भाषिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सीमाभागातील मराठीपण अधोरेखित होते. केंद्राने इथल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे भाषिक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजेत.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावर युवा समिती कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सुरज कुडूचकर, आनंद आपटेकर, सतीश पाटील, किरण हुद्दार, नितीन आनंदाचे आदी उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खालील पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, अमित देसाई, संतोष कृष्णाचे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, विनायक कावळे, आशिष कोचेरि, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, साईनाथ शिरोडकर, महांतेश अलगोंडी, अजय सुतार, युवराज मुतगेकर, प्रवीण भोसले, जगन्नाथ कुंडेकर, सुरज पाटील, विनय परब, शुभम जाधव, महेश कोनो, निखिल देसाई, विशाल गौंडाडकर, साईराज जाधव, रोहन कुंडेकर, विक्रांत लाड , प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, ओमकार नारळकर, ओमकार चौगुले, अक्षय चौगुले, आनंद पाटील, शुभम मोरे, अशोक पाटील, अनिश पोटे, वैभव अतीवाडकर, सुरज चव्हाण, विकास भेकणे, जोतिबा पाटील, राकेश सावंत, कुलदीप कानशिडे, यश तारिहाळकर, अविनाश चौगुले, योगेश पाटील, सागर मुतगेकर, अभिजित अष्टेकर, कर्ण पाटील, दिनेश मोळेराखी, रितेश पावले, साक्षी गोरल, श्वेता कुडूचकर, प्राजक्ता केसरकर, वैष्णवी चौगुले, वृषाली पाटील, रोहन शेलार, साहिल मजुकर, महेश चौगुले, प्रवीण कोराने, सौरभ जोशी, पार्थ वाडकर, निखिल चींगळे, दर्शन घाटेगस्ती, श्री पाटील, आर्यन कारकद, ओमकार मनवाडकर, ओमकार शिंदे, परशराम शिंदे, प्रियांका पाटील, तृप्ती भोसले, स्नेहल, ऋतुजा झाझरी, सोनाली लोहार, रोहन कांग्राळकर, जयंत मोटराचे, प्रल्हाद नाईक, पृथ्वीराज धामनेकर, निकिता चौगुले, साक्षी गुरव, ऋतुजा पाटील, वैष्णवी मंगनाईक, प्राजक्ता पाटील, ममता चौगुले, नक्षत्रा मनवाडकर, शितल सुंठकर, हर्षदा चौगुले, सृष्टी किल्लेकर, दिव्या गावडे श्रद्धा मोरे, जान्हवी केसरकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta