
बेळगाव : बेळगावातील अनगोळ येथे काल सायंकाळी भव्य मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र, हे अनधिकृत असून शिष्टाचारानुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणखी एकदा दणक्यात करण्यात येणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
बेळगावातील अनगोळ येथे रविवारी सायंकाळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आल्याने अनगोळच्या जनतेने आज पुन्हा बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, रविवारी अनगोळ येथे आयोजित छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्ती अनावरणाचा कार्यक्रम अनधिकृत व शिष्टाचाराचे उल्लंघन करणारा होता. छत्रपती संभाजी मूर्तीचे अनावरण अनधिकृत आहे. ते म्हणाले की, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केली जाईल आणि आमदार, मंत्री, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्व समाजाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाईल आणि मी शनिवारी अनगोळमधील ज्येष्ठांशी बोललो. कार्यक्रमाचा रीतसर महापालिकेत ठराव पास होऊन शहर पोलीस आयुक्तालयाची एनओसी मिळवून शासनाकडे पाठवली जाईल व जिल्हा प्रशासन मोठ्या थाटामाटात मूर्तीचे लोकार्पण करेल तसेच उपस्थित मान्यवरांच्या नावाचा फलकही लावण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती बॅरिकेड लावण्यात येणार आहे. लवकरच अनगोळ गावाला भेट देऊन सर्वांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनगोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta