
बेळगाव : इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत बेळगावात आज नागरिक हित रक्षणा समिती आणि इस्कॉनच्यावतीने बेळगाव शहरामध्ये हिंदू जनक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशामध्ये अटकेत असलेल्या इस्कॉनचे श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे नागरिक हित रक्षणा समिती व इस्कॉनच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. इस्कॉनच्या श्री चिन्मयकृष्णदास स्वामीजी यांना बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. तसेच तेथील मंदिरेही उद्ध्वस्त झाली आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत. हिंदूंच्या सुरू असलेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.
इस्कॉनचे श्री नागेंद्र स्वामीजी म्हणाले, बांगलादेशात हिंदूस्वामींवर अन्याय झाला आहे. जोपर्यंत चिन्मयकृष्णदास स्वामीजींची सुटका होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. यासाठी आपण एकत्रितपणे लढा देऊ. जैन समाजाचे प्रमुख राजेंद्र जैन म्हणाले की, स्वामीजींची सुटका होई पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार. स्वामीजींना सोडवण्यासाठी आलेल्या वकिलांवरही हल्ले करून त्यांची हत्या करण्यात आली. ऋषीमुनी अहिंसेचा मार्ग अवलंबतात. मात्र, धर्मावर संकट आल्यावर तलवार हाती घेण्यासाठी देखील तयार असल्याचे सांगितले. आणखी एका स्वामीजी म्हणाले की, हिंदुस्थानच्या स्वामींची ताबडतोब सुटका करावी. तसे न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा दिला. यासंदर्भातील निवेदन बेळगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले होते. यावेळी विविध संस्थांचे स्वामीजी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta