बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे आज (ता. १२) होणाऱ्या युवा मेळाव्यासाठी चलो मराठा सांस्कृतिक भवनचा नारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत मेळाव्याच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवा आघाडीतर्फे शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे दुपारी तीन वाजता युवा मेळावा आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि तालुक्यात बैठका घेऊन मेळाव्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
मेळाव्याला आमदार रोहित पाटील, शिवव्याख्याते प्रा. मधुकर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मेळावा होणाऱ्या ठिकाणी भगवे ध्वज लावण्यासह परिसरात इतर प्रकारची तयारी करण्यात आली आहे.
समितीच्या कार्यामध्ये पुन्हा एकदा युवा वर्ग सक्रिय व्हावा, तसेच सीमा लढ्याला पुन्हा बळकटी देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहर समिती, युवा समिती, खानापूर तालुका समितीसह इतर संघटनांनी पाठिंबा जाहीर करीत मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta