Monday , December 8 2025
Breaking News

मच्छे येथे स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी

Spread the love

 

 

बेळगाव : मच्छे येथील जिजामाता चौक येथे गावातील सर्व नागरिकांतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन श्री बाल शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष संभाजी कणबरकर यांनी केले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते राजू नावगेकर यांनी केले.
यावेळी डॉक्टर पद्मराज पाटील, विनायक चौगुले व बजरंग धामणेकर यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर मौलिक विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनायक चौगुले यांनी केले.
नारायण अनगोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे, पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच गणपत गल्लीतील नागरिक व युवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *