Thursday , March 5 2026
Breaking News

हुतात्मा दिनी सीमाभागात कडकडीत हरताळ पाळा; शहर समितीच्या बैठकीत निर्णय

Spread the love

 

बेळगाव : हुतात्मा दिनानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी बेळगाव सीमाभागातील नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा चौक बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर होते
सकाळी ठीक साडेआठ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल त्यानंतर सर्व समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बर्डे पेट्रोल पंप येथे एकत्र येऊन कोल्हापूर येथे रवाना व्हायचे आहे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन करावयाचे आहे. त्यानंतर सकल मराठा समाजातर्फे सायंकाळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समिती कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी बोलताना मालोजी अष्टेकर म्हणाले की, हुतात्मा दिनासंदर्भात पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आले असून प्रशासनाच्या पुढील धोरणाबाबत माहिती घेण्याचा समिती पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हुतात्म्यांना अभिवादन करून सीमावासीयांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रशासनाला दाखवून द्यावी, सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारची संपर्क साधला जात असून सीमाप्रश्नी चालना देण्यासाठी समितीचे प्रयत्न चालू आहेत असे त्यांनी सांगितले.
17 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या “चलो कोल्हापूर” येथील धरणे आंदोलनाबाबत कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या डाव्याला गती यावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिली.

रमाकांत कोंडूसकर म्हणाले, म. ए. समितीने सीमाप्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा. भूसंपादनाविरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.

मदन बामणे म्हणाले, मध्यवर्ती समितीने घटक समितींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. यावेळी रणजित चव्हाण – पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, विश्वनाथ सूर्यवंशी, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अनिल अंबरोळे, युवा समितीचे शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, बाबू कोले, श्रीधर खन्नूकर, रणजित हावळण्णाचे, प्रकाश नेसरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवराज पाटील, विकास कलघटगी, सचिन केळवेकर, मोतेश बारदेसकर, अभिजित मजुकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *